जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४
कॉपर तारांचे भंगार देण्याच्या बहाण्याने आंध्रप्रदेशातील एका व्यापाऱ्याला जळगाव तालुक्यातील भादली येथे बोलवून पाच जणांनी बेदम मारहाण करून लुटले. व्यापाऱ्याच्या युपीआयवरून ९० हजार रुपये ट्रान्सफर करण्यासह सोन्याची साखळी, अंगठी, घड्याळ काढून घेत एकूण १ लाख ५१ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल होताच नशिराबाद पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासचक्रे फिरवीत मनवेल येथील जंगातून टोळीच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रदेशातील कॉपरचे भंगार खरेदीविक्रीचा व्यवसाय करणारे दुर्गावेंकटेशराव सूर्यनारायण काटाकोटा (वय ४१, रा. वाटलुरू, जि. वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश) हे वास्तव्यास आहे. कॉपरचे भंगार व्यावसियाकांचा एक व्हाटस अॅप ग्रुप असून आठवडाभरापूर्वी त्यांना दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. यावेळी त्यांना कॉपरचे भंगार विक्री असल्याचे समोरील व्यक्तींकडून सांगण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला व्यापाऱ्याने भंगारचे फोटो मागविले. भंगारचे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी मोबाईलधारकाकडून लोकेशन मागवून दि. ९ डिसेंबर रोजी जळगाव तालुक्यातील भादली येथे पोहचले. त्यांना घेण्यासाठी एक जण दुचाकी घेऊन आला व व्यापाऱ्याला गावाच्या बाहेर असलेल्या पाटचारी जवळील पंप हाऊस येथे घेऊन गेला .
गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकाने अवघ्या चार तासात गुन्ह्याचा छळा लावल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पथकाचे कौतुक केले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत. पोलिसांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडताना या गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का, या संशयितांनी अजून गुन्हे केले आहे का, यासाठी पोलिस कोठडी मागितली. तसेच युपीआयवर ट्रान्सफर केलेल्या ९० हजार रुपयांविषयी माहिती घेऊन मोबाईल हस्तगत करणे व बैंक स्टेटमेंट प्राप्त करणे बाकी असल्याचे नमूद केले आहे.
