जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२४
सेंट्रींग कामावरुन घराकडे जाणाऱ्या दुचाकस्वारांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. घडक इतकी जोरात होती की, दोघ दुचाकीस्वारांच्या चेहरा चंदामेंदा होवून एक दुचाकीस्वार तरुण दुचाकीच्या मागील चाकात अडकून पडला होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील फुफनगरी फाट्याजवळील वळणावर घडली. या अपघातात कृष्णा उर्फ अमोल आनंदा कोळी (वय ३०) व पंकज शंकर कोळी (वय २८, दोघ रा. चाडी, ता. जळगाव) या दोघ मित्रांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील घाडर्डी येथील पंकज कोळी व कृष्णा उर्फ अमोल कोळी हे दोघ मित्र सेंट्रीग कामासाठी जळगावात आले होते. कामावरून सुट्टी झाल्यानंतर ते दोघ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास (एमएच १९, एव्ही ३४४६) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. कानळदा रोडवरील फुफनगरी फाट्याजवळील वळणावरुन जात असतांना कानळद्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, झेड ८०६७) क्रमांकाच्या डबरच्या डंपरने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दोघ दुचाकीस्वार तरुणांना डंपरचे सुमारे शंभर मिटरपर्यंत फरफटत नेले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पवार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच घाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांनी दोघ तरुणांचे मृतदेह बघताच एकच आक्रोश केला.
दुचाकी आणि डंपरच्या या अपघाताची भीषणता इतकी होती की, दुचाकीस्वार तरुण हे थेट डंपरच्या धडकेत त्या दोघां डोक्याचा चेंदामेंदा होवून रक्तामासाचे तुकडे हे डंपरच्या डिझेल टाकीवर उडाले होते. तर दुचाकीवरील एक जण हा दुचाकीच्या मागील चाकात अडकून गेला होता. अपघातात ठार झालेले दोघ युवक जीवलग मित्र होते. ते दोघे सेंट्रीग काम करुन ते कुटुंबाला हातभार लावित होते. मात्र त्याचसोबत ते शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर देखील खरेदी करणार होते. ट्रैक्टर पाहून ते घराकडे जाण्यासाठी निघाले, मात्र त्यापुर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेमुळे गावाह हळहळ व्यक्त केली जात होती.
अपघातात ठार झालेल्या कृष्णावी मुलगी देविका हीचा शनिवारी पहिला वाढदिवस होता. मुलीचा पहिला वाढदिवसाची कृष्णाकडून तयारी केली जात होती. परंतु त्यापुर्वीच दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घालीत चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतले. कृष्णाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची चिमुकली देविका असा तर पंकजच्या पश्चात आई, वडील, भाऊ व विवाहीत बहिण असा परिवार आहे.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नागरिकांनी याठिकाणाहून दिवसभर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाळूचे डंपर आणि ट्रॅक्टर जात असतात असे म्हणत संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने अशा भीषण अपघाताच्या घटना देखील अनेकदा घडल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात गर्दी केली होती. फुफनगरी व वडनगरी फाटया दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठे धोकेदायक वळण आहे. या गोलाकार वळणावर समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने याठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात. गेल्या वर्षभरात हा चौथा अपघात असून महाशिवरात्रीच्या दिवशी डीजेच्या वाहनाने तरुणाला चिरडले होते, तर जून महिन्यात दाम्पत्याला धडक दिल्याने ते दोघ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.