जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४
शुक्रवार दिनांक 20 डिसेम्बर 2024 रोजी संध्याकाळी7.30वाजता सम्यक बुद्ध विहार मध्ये राष्ट्रसंत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रमुख वक्ते आयु प्रा प्रितीलाल पवार माजी उपप्राचार्य विद्यानिकेतन,केंद्रीय शिक्षक ,संस्कार प्रमुख भा बौ महा सभा, आयु संतोष गायकवाड बौद्धाचारी ,डॉ प्रकाश वानखेडे, आयु कैलास तायडे सर माजी केंद्र प्रमुख, आयु प्रा यशवंतराव मोरे, माजी प्राचार्य.विद्यानिकेतन यांची गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त जीवन कार्यावर भाषणं झाली.
आयु पवार सरांनी महाविद्यालय,विद्यापीठ , आणि अधिकारी कर्मचारी वर्गाला, सामान्य माणसाला समजेल असे,गाडगे बाबानचे विचार उदाहरणासह व्यक्त केले.कार्यक्रम अध्यक्ष आयु त्र्यंबक जाधव परीट समाज हे होते कार्यक्रम यशस्वितेसाठी आयु श्रावण सपकाळे,मधुकर जोहरे,अशोक सोनवणे,रवींद्र निकम,अभय सोनवणे,दीपक भालेराव,रवींद्र बाविस्कर , सागर सपकाळे, दीपक भालेराव दिलीप सोनवणे सुनील इंधाटे गणेशभाऊ न्हावी रमेशभाऊ परीट ,संजय कोतकर आणि इतर असंख्य धम्म बांधवांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन,आयु जितेंद्र सोनवणे आणि आभार प्रदर्शन आयु विजय सुरवाडे यांनी केले .