जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२५
शिक्षणाचे मर्म जाणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपापल्या भागात सामान्यांना ज्ञानाची कवाडे खुली करून देणाऱ्या थोर कार्याची ओळख आजच्या पिढीला व्हावी म्हणून ग्रामगौरव फौंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील 25 महान विभूतींच्या कार्याची प्रेरणागाथा प्रकाशन व ज्ञानमर्मी जीवन गौरव स्मृती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ कृषी व जलतज्ञ् तथा दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शंकरराव मगर यांच्या शुभहस्ते व राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा होणार आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघांचे विधानपरिषद सदस्य आ. सत्यजित तांबे समारंभाचे उदघाटन तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ज्ञानमर्मी प्रेरणागाथेच्या मुखपृष्ठाचे अनावरण करणार आहेत.माजी मंत्री अनिल पाटील, आ.राजुमामा भोळे,आ.मंगेश चव्हाण,आ.अमोल पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षण व सहकारी संस्था क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहणार आहे.
यांच्या कार्याच्या स्मृतीला मिळणार उजाळा :
जळगाव जिल्ह्यातील आजच्या घडीला मोठ्या झालेल्या शैक्षणिक परंपरेला तत्कालीन कालखंडात ज्ञानाचे मर्म जाणून प्रारंभ करणाऱ्या पण आज हयात नसलेल्या 21 व्यक्तिमत्वच्या कार्याला या सन्मानामुळे उजाळा मिळणार आहे,त्यांची नामावली :
● मधुकरराव चौधरी (खिरोदा) ● प्रतापशेठ अग्रवाल (अमळनेर)● शरश्चंद्रिका पाटील व डॉ. सुरेश पाटील (चोपडा) ● आचार्य गजाननराव गरुड, आप्पासाहेब गरुड आणि भास्करराव गरुड (शेंदुर्णी)●डॉ. जी.डी. बेंडाळे (जळगाव)●के.एम.बापू पाटील (पाचोरा)● जे. टी. महाजन ( न्हावी )● के.नारखेडे (भुसावळ)● ओंकार वाघ (पाचोरा)● आर.जी. झांबरे (भुसावळ)● यशवंतराव चव्हाण (चाळीसगाव)● डॉ. अविनाश आचार्य (जळगाव) ● आबाजी पाटील (शहापूर, जामनेर)● कर्मवीर हरी रावजी पाटील (आमडदे)● भास्कर आप्पा पाटील(पारोळा)● डीगंबर शंकर पाटील (एरंडोल) ● देविदास गोविंदा फालक (भुसावळ)● आर.ओ.पाटील (पाचोरा)● मोतीभाऊ कोटेचा (भुसावळ)● स्वातंत्र्यसैनिक बी. डी. थेपडे (म्हसावद)● रामराव दगडू पाटील (उंबरखेड)
ज्यांनी काळाची गरज ओळखून नवनवीन शिक्षणक्रम सुरु करत पुणे-मुंबईच्या सुविधा आपल्या स्थानिक भागातच उपलब्ध करून दिल्या असे : ● माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील ● माजी खासदार डॉ. उल्हास पाटील ● जळगावचे माजी उपमहापौर हाजी डॉ. अब्दुल करीम सालार ● फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ ● माजी जिल्हा परिषद सदस्य डी. एम. पाटील (पाचोरा) ● डॉ. शरद शिंदे (अमळनेर) ● शिवाजी सीताराम पाटील (सतखेडा) यांना सुद्धा ज्ञानमर्मी सन्मान देऊन आजच्या पिढीपुढे त्यांचा आदर्श ठेवण्यात येणार आहे.
कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात येत्या बुधवार,5 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता संपन्न होणार असून जिल्ह्यातील ज्ञानमर्मी व्यक्तिमत्त्वांना जाणून घेण्यासाठी उपस्थितीचे आवाहन ग्रामगौरव फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे व सचिव सुभाष मराठे यांनी केले आहे