मुबंई : वृत्तसंस्था
राज्यात सत्तेचा तिढा दोन दिवसापासून सुटता सुटत नाही होता पण आज सुरतेतील आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलंय. जवळपास ४१ आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. सेनेला मोठं भगदाड पाडलं. स्वत: प्रतोद नेमला आणि खरी शिवसेना त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. यानंतर राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याचं स्पष्ट झालंय.
उद्धव ठाकरे यांनी वर्षावरून मातोश्रीकडे प्रस्थान केलंय. आणि तुमचं म्हणणं असेल तर शिवसेना प्रमुखपदही सोडतो, असं म्हणाले. यानंतर आणखी ट्वीस्ट येणार हे स्पष्ट झालंय.
एकनाथ शिंदे यांनी सर्व सूत्र हातात घेतल्याचं स्पष्ट झालंय. त्यांनी कायदेशीरपणे जाण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीच्या कचाट्यात सापडलेले प्रताप सरनाईक सध्या शिंदेंसोबत आहेत. सूनील प्रभूला बघू, असं ते म्हणाले.
सत्ताकेंद्र बदललं! राजकारण फिरलं! #MaharashtraPoliticalCrisis #MaharashtraPoliticalTurmoil #ShivsenaMLA #Shivsena pic.twitter.com/UuDm4rE2Fv
— Omkar Wable (@omkarasks) June 23, 2022
एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय
एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून ते आपल्या आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. त्यांना यावेळी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आपल्या निर्णयाला काही कमी पडू देणार नाही, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय




















