जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात सुरवात झाली. तीन दिवसीय या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल प्रशिक्षक तथा शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार्थी श्री.किशोर चौधरी यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव तथा कबड्डी प्रशिक्षक प्रा. हरीश शेळके, पर्यवेक्षक श्री.शशिकांत रायसिंग, श्रीमती प्रमोदिनी बाविस्कर, श्री.अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच मैदान पूजन करून श्रीफळ वाढवून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे लिपिक तथा कबड्डी खेळाडू श्री.विशाल सोनवणे यांची राज्य कबड्डी स्पर्धेत जिल्हा कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयातील सेवक श्री.राजेंद्र सपकाळे यांचे वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन श्री.विनोद कोळी यांनी केले क्रीडा महोत्सवाच्या आयोजनास विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे तीन दिवसीय या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ, मनोरंजनात्मक खेळ, पारंपरिक खेळ यांचा समावेश आहे.