जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
संभाजी ब्रिगेड जळगावच्यावतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
स्वराज्याच्या अनेक सुवर्ण क्षणांपैकी एक क्षण म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 345 वा राज्याभिषेक दिन. आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदिप पाटील, मयूर चौधरी, प्रफुल पाटील, शोभाराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र पाटील नरसिंग पाटील, निलेश पाटील, राकेश राजपूत, जितेंद्र सावंत, प्रमोद कुंभार,राजकुमार पाटील, सुरेश धनगर, अनिल पाटील, भूषण साळुंखे, राकेश कोठारी हे सर्व मान्यवर उपस्थित होते.