जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२५
अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथे घराच्या सामाईक भिंतीवर सेटअप बॉक्स लावण्याच्या वादातून तिघांना मारहाण केल्याची घटना १५ रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळे येथील आबा कौतिक महाले (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आबा महाले त्याच्या शेजारच्या सामाईक भिंतींवर सेटअप बॉक्स लावत होता. त्याचा आवान ऐकून शेजारी राहणारे रितेश महाले व मंगला सुभाष महाले यांनी महाले व कुटुंबीयांना शिवीगाळ केली.
थोड्या वेळाने सुभाष एकनाथ महाले हा मद्य प्राशन करुन काठी घेऊन तर रितेश हा लोखंडी रॉड घेऊन आला व त्यांनी आबा महाले यांना मारहाण केली. महाले यांची आई व मुलगा सोडवायला आले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आबा महालेच्या डोक्याला व उजव्या हाताच्या अंगठ्याला इजा झाली आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन आबा महाले यांनी मारवड पोलिसांत तक्रार दाखल दिल्यावरुन सुभाष एकनाथ महाले, रितेश सुभाष महाले, मंगला सुभाष महाले या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉ. विनोद साळी करत आहेत.
