मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं खुद्द संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं. त्यानंतर गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट केलं आहे. हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर’, असा निर्धार त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खासदार संजय राऊत यांना टॅग केलं आहे तसेच मी शिवसैनिक असा हॅशटॅगही वापरला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?
“हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू”
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….
तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…#MiShivsainik @rautsanjay61— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022




















