मुंबई : वृत्तसंस्था
शिवसैनिक बंडखोरांच्या विरोधात तर बंडखोरांचे समर्थक आपल्या नेत्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले आहेत. यात शिवसैनिक आणि शिंदे यांचे समर्थक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आलेत त्यावेळी शिवसैनिक महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेलेत. पोलिसांशी धक्काबुक्की केली. यावरून मनसेने डिवचलं आहे. महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे उद्धव ठाकरेंचे सैनिक?
महिला पोलिसांच्या अक्षरशः अंगावर धावून जाणारे हे उध्दव ठाकरेंचे सैनिक ?
पोलिसांना मारहाण करणारे,हे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकतात का ?
संदीप देशपांडे यांचा स्पर्श देखील झाला नव्हता आणि महिला पोलीस कर्मचारी पडली तेव्हा केलेलं नीच राजकारण आठवतंय का ?
आता काय कारवाई करणार ? pic.twitter.com/BGjAaOZzkP
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 27, 2022
कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्या विरोधात जयसिंगपूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. प्रत्युत्तरात ‘आम्ही यड्रावकर’ अशी घोषणा देत त्यांचे हजारो समर्थक कार्यालयासमोर जमले होते. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटापटीत शिवसैनिक कार्यकर्ते आणि काही महिला पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली.
“महिला पोलिसांच्या अक्षरशः अंगावर धावून जाणारे हे उद्धव ठाकरेंचे सैनिक? पोलिसांना मारहाण करणारे, हे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकतात का? संदीप देशपांडे यांचा स्पर्शदेखील झाला नव्हता आणि महिला पोलीस कर्मचारी पडली तेव्हा केलेले नीच राजकारण आठवते का? आता काय कारवाई करणार?” असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी व्हिडीओ ट्विट करून विचारला.




















