अकोला : वृत्तसंस्था
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसोबत केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती हादरुन गेली आहे. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाला कोंडीत पकडत त्यांना डोक्याला हात लावण्यास भाग पाडायला लावलं आहे. दरम्यान राज्यातील परिस्थिती अनेक राजकीय जाणकार आणि वकील आपलं मत मांडत आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही आजच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. आजची राजकीय स्थिती चार नवऱ्यांचं नाव लावणाऱ्या बाई सारखी असल्याचं भाष्य अॅड. निकम यांनी केलं आहे. ते आज एका खाजगी कार्यक्रमासाठी अकोल्यात आले आहेत त्यावेळी पत्रकारांसी संवाद साधला.
पोलिस महिलेच्या अंगावर धावून जाणारे उद्धव ठाकरेंचे सैनिक? मनसेने डिवचले
राज्यात सध्य मोठ्या घडामोडी सुरू आहेत. त्यावर उज्ज्वल निकम म्हणाले, वसंतरावच्या घरी नांदायचं. गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाचं घालायचं आणि उखाणा विलासराव नावाने घ्यायचा आणि गर्भ देवरावांचा, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली आहे. सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे, आपल्याकडे कसा येईल, हाच प्रयत्न सध्या प्रत्येक राजकीय पक्ष करीत आहेत. तर पक्षांतर कायदा हा लोकशाही सुदृढ करण्यासाठी आहे. पण यातही पळवाटा आहेत. यासाठी पक्षांतर कायद्याचे स्वरूप जाचक केले पाहिजे जेणेकरून एका पक्षात दुसऱ्या पक्षात जाण्याचा कोणी धाडस करणार नाही, असा सल्ला आज वरिष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी दिला आहे.
उपसभापती हे विधानसभेचे कामकाज पाहतात यादरम्यान त्यांना सभापतीचे अधिकार असतात जर उपसभापतीवर अविश्वास दाखविला आणि तो जर फेटाळला गेला, तर दाद मागण्यासाठी न्यायालयात जावे लागेल आणि त्यावर काय निकाल देते हे त्या निकालावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे. दरम्यान हे कुठेतरी थांबले पाहिजे. कारण पावसाळा तोंडावर आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे यासाठी सरकारला ताबडतोब काहीतरी करून या सरकारला स्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असल्याचं सूचक वक्तव्य उज्वल निकम यांनी केले आहे.




















