जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२५
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाठ यांनी आता पलटवार केला आहे.
मंत्री शिरसाठ म्हणाले कि, त्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत, याबद्दल आम्हाला बोलायला लावू नका. आणखी खोलात गेलो तर संपूर्ण महाराष्ट्रात तुमची बेअब्रू होईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ठाकरे गटाकडून नीलम गोर्हे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला शिरसाट यांनीही जोरकस प्रत्युत्तर देताना सांगितले की, मुंबई महापालिकेचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतात हे सगळ्यांना माहीत आहे. जे सत्य आहे ते तुम्हाला मान्य करावेच लागेल. आज जे काय चालले आहे, त्यामुळेच तुमचा पक्ष रसातळाला गेला आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला. तुम्ही कोणाचा एक रुपया खाल्ला नाही हे शपथेवर सांगाल काय, असा थेट सवालही शिरसाट यांनी केला.
विकृतीसारखे शब्द महिलांसाठी वापरू नका. महिलांबद्दल असे बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही काय? कॅबिनेट मंत्रिपद देताना कसे आणि किती पैसे कसे घेतले जायचे हे केसरकर, नारायण राणे यांना विचारा. ऐन वेळेला पत्ता कट केला जातो. तुम्ही केवळ व्यवसाय म्हणून राजकारणाकडे बघत आहात, असा घणाघात शिरसाट यांनी केला.
नीलम गोर्हे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादंगानंतर मंत्री नितेश राणे यांनीही पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले, आजपर्यंत आलेल्या अनुभवाने मी सांगतो. माझे वडील 39 वर्षे शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेही नाहीत. हॉटेलचे बिलही ते देत नाहीत. घरातला एसीही व्हिडीओकॉनचा लावला होता. त्यामुळेच राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती, असा दावा नितेश राणे यांनी केला. बाहेरगावचे तिकीट किंवा खरेदी केलेल्या कपड्यांचे पैसेही ते स्वत: देत नाहीत. तुम्हाला मी संबंदित दुकानाचे नावही देऊ शकतो, असेही नितेश राणे म्हणाले.
