• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

जळगावात लोककलेचा जागर करीत मराठी भाषा गौरव दिन साजरा !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 27, 2025
in सामाजिक
0
स्वारगेट तरुणीच्या अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट : १ लाखांचे बक्षीस जाहीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खान्देश लोककलावंत परिषद व व.वा.वाचनालयाच्या अनमोल सहकार्याने व.वा.वाचनालयाच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम घेण्यात आला.महाराष्ट्राच्या अस्सल लोककला सादर करून विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने भाषिक नवचैतन्य निर्माण करण्यात आले. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात वहीगायन, पोवाडा, भारुड, गोंधळ, लावणी या लोककला प्रकारांचे दमदार सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण प्राचार्य डॉ.गौरी राणे ,व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह,शाहीर विनोद ढगे, प्रा.डाॅ.शुभदा कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सुरूवातीला खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे व समूहाने महाराष्ट्राचे राज्यगीत आपल्या पहाडी आवाजात सादर करून उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले. त्यानंतर खानदेशाची स्वतंत्र ओळख सांगणाऱ्या आणि अस्सल आपल्या मातीतील लोककला वहीगायन सादर करण्यात आली. जळगावच्या वाल्मीक वही मंडळाचे प्रमुख संतोष शामराव चौधरी व समुहाने ,गणपतीची वही, कानबाईची वही सादर करून विद्यार्थीनींना वहीगायन या लोककला प्रकाराची झलक दाखवून मंत्रमुग्ध केले.आयुष्यात प्रथमच महाविद्यालयाच्या मुलांसमोर वहीगायन हा कार्यक्रम होत आहे.अशा उत्स्फूर्त भावना वही मंडळाने बोलून दाखवली.या कलाप्रकाराची ओळख कला सादर होण्यापूर्वी गायत्री बारी या विद्यार्थिनीने उपस्थितांना करून दिली.

वहीगायनानंतर वीररस युक्त पोवाडा आणि भारुड या दोन कलाप्रकारांचे सादरीकरण शाहीर विनोद ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून उपस्थितांमध्ये वीररसाने ऊर्जा निर्माण केली.पराक्रमाचे पोवाडे गात आपल्या पहाडी आणि दमदार आवाजात शाहीर विनोद ढगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. सभागृहात उपस्थितांनी जयभवानी ,जय शिवाजीचा निनाद करीत सभागृह दणाणून सोडले.
पोवाडा गायल्यानंतर शाहीर विनोद ढगे यांनी प्रबोधनात्मक भारुड सादर करून विनोदी शैलीने हास्याचे कारंजे उडवत, दारुमुळे संसाराचा होणारा नाश आपल्या भारुड रूपकामध्ये सादर करून सर्वांना अंतर्मुख केले. पोवाडा या कलेची माहिती मेघा बारी या विद्यार्थिनीने करून दिली.
जळगावच्या अवधूत वामन दलाल व जयमल्हार गोंधळ पार्टीच्यासहकाऱ्यांनी गोंधळ हा कलाप्रकार सादर करून गोंधळाची परंपरा आणि कलेची माहिती देत गणपतीचे कवन सादर करत, येळकोट येळकोट जयमल्हार… चा आवाजात गोंधळ सादर केले. या कलाप्रकाराची ओळख निकीता सोनवणे या विद्यार्थिनीने करून दिली.

यानंतर महाराष्ट्राची लावणी या लोककलेचा परिचय मेघा बारी या विद्यार्थीनीने करून दिला. महाविद्यालयाची प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी किरण राजू बहारे हीने ठसकेबाज चंद्रा ही लावणी सादर करीत सर्वांना खिळवून ठेवले. शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थिनींनी लावणीला उदंड प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून‌ लोककलेसंबंधीची भाषा समृध्दीची वाटचाल अधोरेखित करत कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या उन्नयनासाठी केलेल्या अनमोल साहित्य सेवेचा मागोवा मराठी विभाग प्रमुख डॉ.सत्यजित साळवे यांनी मांडला.मनोगतात डाॅ.शुभदा कुलकर्णी यांनी वाचन संस्कृती वाढावी,रूजावी यासाठी व.वा.वाचनालय जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह यांनी लोकगीत,लोककथा,उखाणी यांचा आणि लोक संस्कारांचा अनुबंध उलगडून दाखविला.प्राचार्य डॉ.गौरी‌ राणे यांनी शालेय जीवनातील भाषेचा लळा सांगत असताना, भाषा म्हणजे आई, आई जितकी प्रिय, तितकीच भाषा आम्हाला प्रिय आहे, असे सांगितले.शाहीर विनोद ढगे यांनी खान्देशाच्या लोककलेच्या प्रवाहात वहीगायनाला राजमान्यता मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ.आशुतोष पाटील यांनी मराठी भाषा आणि लोककला यांच्या अतूट नात्यावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौरी राणे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन अनिलभाई शाह यांचे हस्ते झाले.मंचावर डॉ.शुभदा कुलकर्णी, शाहीर विनोद ढगे, प्रभात चौधरी,डाॅ.सत्यजित साळवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार तर आभार कल्पना खेडकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ.अनिता कोल्हे, डॉ.दीपक किनगे, डॉ.सुजाता गायकवाड,प्रा.सायली पाटील,भास्कर बाणाईत,राजू अत्तरे,राजू तायडे,सुहास उणवणे,गणेश शिवदे यांनी मदत केली.विशेष म्हणजे दीडशे विद्यार्थिनींनी भगव्या फेट्यात आणि मराठमोळ्या वेषात येऊन कार्यक्रम देखणा करीत सक्रीय सहभाग नोंदवला.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group