जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२५
देशभरात सध्या चर्चेत असलेला ‘छावा’ चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून अनेकांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी करीत असतांना दि.२७ फेब्रुवारी रोजी शिरसोली गावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरसोली (जळगाव विभाग) यांच्यामार्फत गावातील बजारपट्टा परिसरात दक्षेश्वर महादेव मंदिराच्या समोर बहु चर्चित छावा चित्रपट दाखवण्यात आला, यावेळेस पाच हजार महिला पुरुष हा चित्रपट बघण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरसोली विभागाचे प्रमुख किरण पाटील, व बाकीचे धारकरी महेश पाटील, विकी पाटील विशाल पाटील, दीपक पाटील, किरण माळी, सुमित असबार, गणेश बारी, गजू बारी, गणेश पाटील या सर्व तरुणांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले, चित्रपट संपल्यानंतर बाजारपट्टा परिसर शिवशंभूच्या घोषणाने दुमदुमून गेला होता.