जळगाव ः प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेची चिंतन बैठक सुरु असून अजून दोन दिवस एरंडोलसह बाकी परिसरात बैठक घेत आहे. तसेच शिवसेनेचे नेते गेले आहेत पण शिवसैनिक अजून आहेत. शनिवारी चित्रा चौकापासून ते अजिंठा चौफुलीपर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
ते बोलतांना पुढे म्हणाले की, शनिवारी होणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये बंडखोरांना दिसून जाईल की जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार गेले आहेत परंतु शिवसैनिक जागेवरच आहेत.
संघटना संपविण्यसाठीच बंडखोरी
कुटूंबात काही वाद विवाद असतात कुटूंबप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी समजविले परंतु जर त्यांच्या मनातच पक्ष संघटना संपविण्याचा उद्देश होता त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. पक्षाला अपेक्षित नव्हते की जवळचेच बंडखोरी होवू शकते. पक्षात कुणाचाही गट नाही फक्त आणि फक्त शिवसेनेत बाळासाहेबांचाच गट आहे. या पत्रकार परिषदेत शिवेसेनेच संपर्कप्रमुख संजय सावंत, विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे यांची उपस्थिती होती.




















