मुंबई : वृत्तसंस्था
एकनाथ शिंदे बंडखोरी करत शिवसेनेचे अनेक आमदार गाळला लावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा गट उद्या (गुरूवार) मुंबईत येणार आहे. त्यावेळी त्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी विमानतळ परिसरात उपस्थित राहण्याचे आदेशही पक्षश्रेठींनी भाजपच्या कर्त्याकर्त्यांना दिले आहे. यादरम्यान भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपासह छावा संघटनेचे कार्यकर्ते देखील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहे. छावा संघटनेचे 2 हजार कार्यकर्ते मानतळ ते विधानभवनपर्यंत या बंडखोर आमदारांना समर्थन देणार आहेत.





















