मेष राशी
श्रीगणेश म्हणतात, आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वत:च्या निर्णयाला प्राधान्य द्या. मालमत्ता खरेदीच्या विचारात असाल तर गांभीर्याने विचार करा. कुटुंबात एखाद्या गोष्टीबाबत तणावपूर्ण परिस्थिती असू शकते. आईच्या आरोग्याबद्दल चिंता असेल. कार्यक्षेत्रात कोणतावरही अतिविश्वास ठेवणे घातक ठरेल.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात की, घराच्या देखभाल आणि नूतनीकरणाशी संबंधित योजना आखल्या जातील. खर्चाचे प्रमाण अधिक असेल. आध्यात्मिक आणि धार्मिक कामात सहभागी व्हाल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. व्यवसायात एखादा प्रकल्प पूर्ण करण्याचा तणाव असेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मिथुन राशी
श्रीगणेश म्हणतात की, नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण केली तर यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहिल. इतरांवर अतिविश्वास ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. भागीदारी व्यवसायात गैरसमज निर्माण होऊ शकतात. पती-पत्नी संबंध अधिक मधूर होतील.
कर्क राशी
आज तुम्ही कौटुंबिक सुखसोयींवर खर्च कराल. धार्मिकस्थळी जाण्याचा योग असेल. प्रतिकूल परिस्थितीत संयम बाळगा. रागामुळे कुटुंबातील वातावरण खराब होऊ शकते, याची जाणीव ठेवा. कार्यक्षेत्रात नवीन काम सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करा.
सिंह राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज इतरांना मदत करण्यास प्राधान्य द्याल. समाजात तुमच्याविषयी आदर वाढू शकतो. अतिआत्मविश्वास तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात नवीन धोरण यशस्वी होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल.
कन्या राशी
श्रीगणेश सांगतात की, आज तुमचा बहुतेक वेळ बाहेरच्या कामांमध्ये जाईल. प्रवासाचे नियोजन असेल. तुमची कामे पूर्ण उर्जेने पूर्ण करा. तरुणांनी करिअरबाबत गंभीर राहणे गरजचे. व्यवसायाच्या योजनावर चर्चा करु नका. कुटुंबातील सदस्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
तुळ राशी
ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे, याचा पुरेपूर वापर करा. कुटुंबातील वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. सार्वजनिक व्यवहार, मीडिया आणि मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात वेळ फायदेशीर राहील. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.
वृश्चिक राशी
आज तुमचे पूर्ण लक्ष आर्थिक परिस्थितीकडे अधिक असेल. घरातील ज्येष्ठांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्या प्रश्नात ढवळाढवळ करु नका. अन्यथा तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. सरकारी सेवेतील काम करणाऱ्या व्यक्तींसाठी स्थानांतरण योग बनत आहेत. आरोग्याची काळजी घ्या.
धनु राशी
श्रीगणेश सांगतात की, कर्म आणि भाग्य दोन्ही तुमच्या बाजूने काम करत आहेत. आज गूढ शास्त्रांमध्ये तुमची आवड वाढेल. काहीही सखोल जाणून घेण्याची इच्छा असेल. मुलांबरोबर मैत्रीपूर्ण पद्धतीने वागल्याने त्यांची समस्या सुटेल.
मकर राशी
तुम्ही गेल्या काही काळापासून शिस्तबद्ध आणि नियमित दिनचर्याचा आज फायदा होईल. मात्र बेकायदशीर कृत्यात सहभागी असणार्यांकडून तुमची बदनामी होवू शकते. व्यवसाय तीव्र स्पर्धा जाणवेल. पती-पत्नी नात्यात वैचारिक मतभेद असतील. मात्र अनेक ठिकाणी उधार दिलेले पैसे आज मिळण्याची मोठी शक्यता आहे.
कुंभ राशी
श्रीगणेश म्हणतात की, ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मीन राशी
तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. व्यवसायातही नवीन योजना राबवाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. संपर्कक्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात पत्नीच्या सहकार्यामुळे आनंद वाटेल. कुटुंबातील सदस्यांशी काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरगुती समस्या सुटतील.