जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२५
पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे विहिरीचे काम करताना क्रेनच्या बकेटमधील दगड खाली विहिरीत काम करणाऱ्या मजुराच्या अंगावर पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. लोणी बुद्रुक येथे भगवान वामन पाटील यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साह्याने विहिरींमधील दगड बकेटच्या साह्याने बाहेर काढत होते.
याचवेळी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शिंदी पिंपळगाव येथील देविदास शिवाजी झेंडे (वय ३८) हा मजूर विहिरीत काम करत होता. त्यांच्या अंगावर बकेटमधील दगड पडल्याने तो बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत त्यांना विहिरीतून बाहेर काढून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.