
जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२५
महावितरणच्या कार्यालयात कर्तव्यावर हजर असताना मनोज रामू लांडगे (वय ३०, रा. सत्यम पार्क, जळगाव, मूळ टेकाअर्जुने ता. दिवटी जि. चंद्रपूर) या तरुण वायरमनला अचानक हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २० एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील कार्यालयात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूर येथील वायरमन मनोज लांडगे हे आई, वडील, पत्नी, एक ४ वर्षांचा मुलगा यांचेसह राहत होते. महावितरणच्या कार्यालयात वायरमन म्हणून गेली ८ वर्षे ते जळगावत सेवेत होते. दरम्यान मनोज लांडगे रविवारी दि. २० एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे महावितरणच्या शिवाजीनगर येथील कार्यालयामध्ये सहकाऱ्यांसह कर्तव्याला होते. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांची छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथून वैद्यकीय पथकाने पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मनोज लांडगे यांना मयत घोषित केले. याप्रकरणी श-हर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















