
जळगाव मिरर | ४ मे २०२५
यावल तालुक्यातील बुऱ्हाणपूर ते अंकलेश्वर राज्य महामार्गावरील चिंचोलीजवळ पहाटे २ ते २.३० वाजेच्या सुमारास गुजरातकडून जाणाऱ्या चारचाकीने रस्त्यावर कोसळलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात चारचाकीमधील चार जण जखमी तर १ जण गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून होंडा कंपनीची चारचाकी (जीजे- ०५, जेई- ८०७१) ने काही जण भुसावळला एका लग्न संमारभास जात होते. दरम्यान, हे वाहन चिंचोली ते धानोरा रस्त्यादरम्यान कोसळलेल्या मोठया निंबाच्या झाडाला या गाडीने जबर धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहे. तर कार चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तिस गंभीर इजा झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. हे सर्व जण गुजरात राज्यातील राहणार असल्याचे समजते. हा अपघात ३ मे रोजी पहाटे अडीच ते तिन वाजेदरम्यान झाल्याचे वृत्त आहे. या अपघातातील जखमींना तत्काळ उपचारार्थ जळगाव येथे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज्य मार्गाच्या कडेला असलेली मोठी जिवंत झाडे पाडण्याचे प्रकार समोर येत असून हे मोठे जिवंत झाड कोसळले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.




















