
जळगाव मिरर | ५ मे २०२५
शहरातील कांचन नगर परिसरातील १९ वर्षीय तरुण योगेश घनःश्याम काळे याने घरी कुणीही नसताना गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (४ मे) दुपारी उघडकीस आली. आई घरी आल्यानंतर तिला एकुलता एक मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मजुरी काम करणारा योगेश काळे हा तरुण आई व मामासह कांचन नगरात राहत होता.
रविवारी दपारी आई बाहेर गेलेली असताना त्याने गळफास घेतला. काही वेळानंतर त्याची आई घरी आली व दरवाजा उघडताच योगेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















