
जळगाव मिरर | १९ मे २०२५
जळगाव शहरातील मेहरूण स्मशानभूमीमध्ये इलेक्ट्रीक शवदाहिनी बसविणे, सभा मंडपासह सुविधा पुरविण्याबाबत जळगाव मनसेच्या पदाधिकाऱ्यानी आज जळगाव मनपाचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील मेहरूण परीसरातील स्मशानभूमी मध्ये नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे. दररोज तेथे होणाऱ्या शवदहनामुळे प्रदुषण देखील होत असतांना आपण त्यामध्ये सुधारणा करण्याकरीता या स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी महानगरपालीकेतर्फे लावुन दिल्यास नागरीकांच्या वेळेची बचत होऊन पर्यावरणाचे नुकसान व प्रदुषण होणार नसल्याने वसुंधरा / पृथ्वी चे संरक्षण देखील होणार आहे. तसेच उन्हाळा, पावसाळा मध्ये शवदहन करणाऱ्या नागरीकांना स्मशानभूमीमध्ये सभामंडप नसल्याने उन्हात, पावसात उभे राहून शव दहन करावे लागते, जर याठिकाणी सभामंडप बांधल्यास नागरीकांना याठिकाणी सुविधा प्राप्त होईल.
तरी महोदयांना नम्र विनंती की, मेहरूण स्मशानभूमी मध्ये इलेक्ट्रीक शवदाहीनी व सभामंडपाचे बांधकाम करून मिळावे तसेच इतर आवश्यक सुविधा देखील लवकरात लवकर मिळवून द्याव्यात, अशी मेहरूण परीसरातील नागरीकांच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत. कृपया तसदी घ्यावी, ही विनंती.
या निवेदनावर अॅड. जमील देशपांडे, जिल्हा अध्यक्ष (शेतकरी सेना) अविनाश पाटील, उप शहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित (बंटी) शर्मा, चेतन पवार, तालुका संघटक संदीप मांडोळे, महेंद्र सपकाळे, राहुल चव्हाण, महेश माळी, सतीश सैंदाणे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.