जळगाव मिरर | २२ जून २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता जामनेर-बोदवड रस्त्यावरील एका जिनिंगजवळ तीनचाकी रिक्षाला एका कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी ४:३० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारने दिलेल्या धडकेनंतर रिक्षा पलटली. त्यात चालक योगेश ज्ञानदेव मंगळकर (वय २८, रा. नवी दाभाडी, ता. जामनेर) याला गंभीर दुखापत झाली. भुसावळ येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर रिक्षात बसलेले सहा नागरिक जखमी झाले.
त्यात वैशाली ज्ञानदेव मंगळकर (वय ५०), रामदास राजाराम गोरे (वय ७०) हे गंभीर आहेत तर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते
