जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
शहरातील गोलाणी मार्केटजवळील मंदिरानजीक दि. ११ जुलै रोजी दुपारी दीड वाजता कारच्या चाकाजवळ ठेवलेली ४ लाख ५० हजार रुपये रोकड असलेली पिशवी व्यापारी तेथेच विसरून गेले. ही पैशांची पिशवी अज्ञात इसमाने लांबवून नेली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गणेश कॉलनीतील व्यापारी महेश हिरालाल मुणोत (वय ४४) यांनी त्यांच्याजवळील रोख ४ लाख ५० हजार रुपये रोकड असलेली पिशवी कारच्या चाकाजवळ ठेवली. त्यानंतर ती पिशवी ते तेथेच विसरले व दुकानावर निघून गेले. दुकानावर गेल्यानंतर त्यांना पिशवी विसरल्याचे लक्षात आले. त्या वेळी ते गोलाणी मार्केटजवळील मंदिरानजीक परत आले. मात्र तोपर्यंत कोणीतरी ही पिशवी लांबविली होती. रोख रक्कम असलेल्या पिशवीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने मुणोत यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
