
लासुर ता.चोपडा :प्रतिनिधी
परिसरातील मौजे अडावद येथे किसान गप्पागोष्टी कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला. आडावद येथील महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आत्मा योजनेअंतर्गत किसान गप्पागोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतरच अंतर्गत रोपवाटिका नियोजन सुधारित लागवड पद्धती व काढणीपश्चात तंत्रज्ञान या विषयाचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी धुळे कृषी महाविद्यालय येथील विस्तार कृषी उद्यान विषयक प्राध्यापक श्रीधर देसले सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यात पावसाळी, हिवाळी, उन्हाळी तीन हंगामात घेणाऱ्या कांदा लागवड विषयी तांत्रिक मार्गदर्शन केले व कांदा पिकाचे साठवणूक तंत्रज्ञान विषयक माहिती शेतकऱ्यांना दिली, तसेज माननीय श्री प्रतीक चौधरी (संसाधन व्यक्ती) यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना विषयी मार्गदर्शन केले व शेतकरी क्षत्रिय व शेतकरी गटांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जीवन गुरुजी हे होते तसेच श्री दीपक साळुंखे कृषी अधिकारी चोपडा यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व रूपरेषा सांगितली तसेच तालुका शेतकरी सल्लागार समिती चे अध्यक्ष श्री किरण सुधाकर करंदिकर, गणपूर, सरपंच सौ भावना माळी, गुलाबराव पाटील आत्मा कमिटी सदस्य, शेख रफिक शेख रज्जाक, मंगल इंगळे मितावली, नामदेव पाटील सरपंच वडगाव, कडू आप्पा पाटील किनगाव, हेमचंद्र पाटील पंचक, डॉक्टर रवींद्र निकम माचला, संदीप देसले गलवाडे, नरेंद्र पाटील लोणी तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते
कार्यक्रमाचे नियोजन श्री राजेंद्र निकम कृषी सहाय्यक, व श्री महेंद्र रतिलाल साळुंखे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा, श्री. किशोर महाजन,कृषी सहाय्यक, आर. टी. वाल्हे, मंडल कृषी अधिकारी आडावद, श्री एम.एफ. पाटील कृ.प व व तालुक्यातील कृषी विभागातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.




















