जळगाव : प्रतिनिधी
केंद्र सरकार व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे अन्नधान्य व कडधान्यावरील ५ टक्के जीएसटी कर रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला दिले.
जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी आज महाराष्ट्र चेंबरच्या जळगाव शाखा कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी केंद्र सरकारने अन्नधान्य व कडधान्यावर पाच टक्के जीएसटी कर लागू केला आहे त्यास महाराष्ट्र चेंबर व व्यापारी संघटनांतर्फे तीव्र विरोध असल्याचे चेंबरच्या कार्यकारणी सदस्य सौ. संगीता पाटील ,दिलीप गांधी, नितीन इंगळे यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याशी चर्चा करताना सांगितले. तसेच महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे सर्व व्यापारी संघटनांची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली व अन्नधान्यावरील पाच टक्के जीएसटी तरतुदीला तीव्र विरोध करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती दिली.
दाना बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया दालमिल असोसिएशनचे सेक्रेटरी रमेशचंद्र जैन, सराफ बाजार असोसिएशनचे सेक्रेटरी स्वरूप लुंकड महाराष्ट्र यांनी अन्नधान्यावरील पाच टक्के जीएसटी मुळे होणाऱ्या परिणामांची माहिती दिली व व्यापारी सामान्य नागरिक व शेतकरी यांना या पाच टक्के जीएसटी मुळे मोठा त्रास होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी दीपक सूर्यवंशी ,श्री जैन युवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव मेहता व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे जीएसटीचे जॉईट कमिशनर सुभाष भवर व उपजिल्हाधिकारी श्री राहुल पाटील यांची भेट घेऊन कार्यकारणी सदस्य सौ संगीता पाटील ,दिलीप गांधी, प्रवीण पगारिया नितीन इंगळे , स्वरूप लुंकड प्रतिनिधींनी 5 टक्के जीएसटी कर रद्द करण्यासाठी निवेदन दिले.




















