
जळगाव :प्रतिनिधी
शहरातील दीक्षित वाडी परिसरात शुल्लक कारणाने एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार येथे घडला. याप्रकरणी शनिवारी १६ जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील दिक्षीत वाडीतील रहिवासी संजय घनश्याम पाटील (वय-५०) हे आपल्या कुटुंबियांसह रहिवासाला आहे. त्यांच्या घराच्या जवळ सैय्यद आरिफ सैय्यद शाहीद याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. सैय्यद आरिफ याने संजय पाटील यांना न विचारता त्यांच्या घरासमोर बांधकामासाठी लागणारे विटा टाकल्या. यावरून संजय पाटील यांनी सैय्यद आरिफ याला विटा टाकल्याचा जाब शनिवारी १६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता विचारला. याच राग आल्याने सैय्यद आरीफ आणि त्याचा मुलगा आशु सैय्यद आरिफ सैय्यद यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
संजय पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी साडेसात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सैय्यद आरिफ सैय्यद शाहीद आणि आशु सैय्यद आरिफ सैय्यद या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.





















