
यावल : प्रतिनिधी
तालुक्यात दि. १७ दुपारपासून सुरु असलेल्या पावसाने सावखेडा सिम जवळील भोणक नदीला पूर आल्याने दोन वाजेपासून दहिगाव आणि सावघडा सिम या दोघ गावांचा संपर्क तुटला आहे. काल बाजाराचा दिवस होता. मात्र व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
या नदीवर पूल बांधावा अशी मागणी अनेक वर्षापासून परिसरातून होत आहे. वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने नदीवर पूल बांधणे अत्यावश्यक गरज आहे. मात्र आल्यावर पूल बांधण्यात आला नसल्याने नेहमीच दाणादाण उडत असते.




















