जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२५
यंदाचा दसरा अनेक मेळाव्यांच्या माध्यमातून गाजला आहे. यात मंत्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचा देखील मेळावा मोठ्या जल्लोशात झाला . या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणानंतर करुणा मुंडे-शर्मा यांनी मुंडेंवर हल्लाबोल चढविला आहे.
गेले २५० दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असं विधान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात केलं. त्यांनी केलेल्या विधानानंतर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केला आहे.
बीडच्या सावरगाव घाटावरील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या या विधानावर करुणा शर्मा-मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाऊ-बहिणीच्या संबंधांवर, साखर कारखान्यांवर आणि राजकारणातील गुंडगिरीच्या मुद्द्यांवरून टीका केली. या मेळाव्यात मुंडे बहिण भाऊ म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र पाहायला मिळाले. दोघांनीही विविध मुद्यावर भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा-मुंडे?
ज्या बहिणीला आज आधार मानतात, ती किती त्रास देत होती. तुम्ही माझ्या मांडीवर रात्री दोन-दोन, तीन वाजेपर्यंत रडत होता, असं करुणा शर्मा म्हणाल्या. आज तिचा आधार वाटतो का? तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील, कशाप्रकारे न्याय देतील? असा सवालही त्यांनी केला आहे. गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले. आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे ३०-३०, ४०-४० कोटी दोघा कारखान्यांमध्ये अडकलेले आहेत पण तुम्ही देत नाही, असा गंंभीर आरोपही करुणा शर्मा मुंडे यांनी केला आहे.