जळगाव मिरर । ४ ऑक्टोबर २०२५
शहरातील मेहरूण तलावासह गिरणा नदीत पात्रात देवी विसर्जनाची धामधूम सुरु असताना एक तरुण देवी विसर्जन करताना पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे. शर्थीचे प्रयत्न करुनही तो अद्याप सापडलेला नाही. जळगाव येथील गुजराल पेट्रोल पंपाच्या मागे राहणारा हिमेश संतोष पाटील (वय १९) हा तरुण आपल्या तीन ते चार मित्रांसोबत घर बसवलेल्या दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोकणी शिवारातील रेल्वे पुलाजवळील गिरणा नदी पात्रात गेला होता. तेथे सर्व तरुण गेल्यानंतर देवीची पूजा करून ते मूर्ती विसर्जनाला गेले. याचवेळी अचानक आलेल्या प्रवाहात हिमेश पाटील हा तरुण वाहून गेला.
या वेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, त्यावेळी तेथे कुणीही नव्हते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, पाण्याच्या प्रवाह पाहता कुणाची पाण्यात उतरण्याची झाली तर मिळताच पाळधी पोलीस तसेच महसूलचे पथक नदी पात्राजवळ पोहोचले. त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांमार्फत बचाब कार्य सुरू केले. मात्र, हिमेश पाटील हा अद्यापही कोठेच आढळून आलेला नाही. दरम्यान, हा तरुण सापडल्यास पाळधी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे यांनी केले आहे