जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२५
रावेर तालुक्यातील खानापूर येथील संजय शालीग्राम धांडे (वय ६१) हे सततच्या पावसामुळे एकरभर शेतात निर्माण झालेल्या तणातील गवताचे रान कापून घरी परत जात असताना त्यांना शेत नापिकीचा मानसिक धक्का बसल्याने वाटेतच अचानक कोसळून मृत्यू झाला. ही घटना १० ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलाजवळ घडली.
यावेळी त्यांच्यामागून येत असलेले शेतकरी जनार्दन धांडे व प्रवीण धांडे यांनी संजय यांच्या पत्नीला घटनास्थळी बोलावून त्यांना गावातील खासगी रुग्णालयात हलविले. तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांची दोन्ही मुले गजानन व नारायण हे पुणे येथील खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांची अंत्ययात्रा ११ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता त्यांचे राहते घरापासून निघणार आहे. शासनाने त्यांच्या परिवाराला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे