मुबंई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडावर आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच आणली आहे. इकबाल मिरची संदर्भात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, याआधीही या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आता ईडीकडून त्यांचे घर व गाडी जप्त करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असून आणखी काही महत्वाच्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वरळी मधील सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेलांचे घर जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीने बेकायदा पद्धतीने वरळीमधील तीन मालमत्तांच्या विक्रीचा व्यवहार केला आणि त्यात काळा पैशांचा व्यवहार करण्यात अनेकांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.
पुढील माहिती लवकरच… पहा jalgaon mirror




















