• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळूमाफियांची दादागिरी वाढली : पहाटेच्या सुमारास तलाठीवर केला जीवघेणा हल्ला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 13, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाळूमाफियांची दादागिरी वाढली : पहाटेच्या सुमारास तलाठीवर केला जीवघेणा हल्ला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२५

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव ते जळोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना ट्रॅक्टर चालक आणि मालकाने ग्राम महसूल अधिकारी अनंत कबीर माळी (तलाठी) यांना थेट ट्रॅक्टरखाली ओढून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. १२ रोजी सकाळी ६ वाजता घडली. महसूल अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकावर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील बुधगाव ते जळोद दरम्यानच्या पुलाखाली वाळूची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर प्रांत अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी, ग्राम महसूल अधिकारी अनंत कबीर माळी, संतोष कोळी, सुधाकर महाजन, तिलेश पवार आणि भूषण पवार यांचे पथक दि.१२ रोजी पहाटे ४ वाजता कारवाईसाठी गेले सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बुधगाव गावाच्या हद्दीत, बुधगाव ते जळोद रस्त्यावरील पुलाखाली तापी नदीपात्रात पथकाला एक ट्रॅक्टर वाळू भरून येताना दिसला. महसूल पथकाला पाहून तो ट्रॅक्टर सह पळून गेला. पाठलाग करत सदर ट्रॅक्टर जमा करून चोपडा तहसील कार्यालयात नेत असताना ग्राम महसूल अधिकारी अनंत कबीर माळी हे ट्रॅक्टरवर बसले होते. यावेळी ट्रॅक्टर चालक विजय पावरा आणि ट्रॅक्टर मालक अजय कैलास कोळी (दोघेही रा. बुधगाव) यांनी रस्त्यात वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चालक विजय पावरा याने ट्रॅक्टरवर बसलेल्या ग्राम महसूल अधिकारी अनंत कबीर माळी यांची कॉलर पकडून त्यांना खाली ओढले आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने थेट ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूस असलेल्या मागील चाकाच्या समोर फेकून दिले.

सदर प्रकार पाहून सोबत असलेले मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी त्वरीत अनंत माळी यांना तत्काळ बाजूला ओढले. त्यामुळे माळी यांचा जीव वाचला, मात्र या घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर चालक आणि मालक यांनी ट्रॅक्टरमधील वाळू खाली ओतून ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक मधुकर साळवे व पोलिस पथकाने भेट देऊन पंचनामा केला आहे.

जखमी झालेले ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय पावरा आणि मालक अजय कैलास कोळी यांच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी शेषराव नितनवरे करीत आहेत.

Related Posts

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली
क्राईम

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !
क्राईम

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group