जळगाव मिरर । १४ ऑक्टोबर २०२५
अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतात पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ रोजी घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील अंतुर्ली येथील संजय आसाराम पाटील व त्यांच्या पत्नी वंदना संजय पाटील हे खापरखेडा ते अंतुर्ली रस्त्याने शेतात जात होत्या. या वेळी भरत निंबा पाटील (रा. अंतुर्ली) यांची समोरून येणारी दुचाकी (एमएच – ५४, ए- ०१८८) भरधाव वेगाने वंदना पाटील यांना धडकली. या दुर्दैवी अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी भरत पाटील याच्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास हे. कॉ. संजय पाटील करत आहेत.