जळगाव मिरर । १४ ऑक्टोबर २०२५
धारदार चाकूसह तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या शंतनू चंद्रकांत गुरव (वय २६, रा. पंढरपूरनगर) व कमलेश सुरेश पवार (वय १९, रा. खेडी, ता. जळगाव) या दोघांवर दि. १२ रोजी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी परिसरात दि. १२ रोजी दुपारच्या सुमारास संशयित शंतनू गुरव व कमलेश पवार हे दोघ हातात तलवार आणि धारदार चाकू घेवून दहशत माजवित होते. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार तलवार आणि चाकू हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शशिकांत मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.