नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती पदासाठी आज सकाळपासून मत मोजणी सुरु होती. या निवडणुकीत आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू याच ठरल्या आहेत. द्रोपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांच्यावरती सहज विजय प्राप्त केला आहे. आत्ताच राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल हाती आला आहे,
सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतभेटीत १८ तारखेला बंद चालू होतं. आज त्याचा निकाल लागलेला आहे. मुर्मू यांच्यासाठी भाजपने देशभरात जोर लावला होता. त्यासाठी त्यांनी अनेक पक्षांना मतदानासाठी आवाहन केलं होतं. विरोधी पक्षातील काही पक्षांनीही त्यांना या निवडणुकीत मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठी मदत झाली आहे. आदिवासी महिलेला प्रथमच संधी मिळत आहे, असे सांगत शिवसेनेही या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातूनही मुर्मू यांना चांगली मतं मिळाली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजता खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यात द्रौपदी मुर्मू यांना 540, तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदार मते मिळाले. 15 मते रद्द झाली. म्हणजेच आत्तापर्यंतच्या मतमोजणीनुसार खासदार व 10 राज्यांतील 1886 मतांची मोजणी पूर्ण झाली असून, त्यांचे एकूण मूल्य 6 लाख 73 हजार 175 एवढे आहे. दुसरीकडे, मुर्मू यांच्या गावात आनंदोत्सव सुरू झाला आहे.
भाजप देशभरात विजयी मिरवणूक काढणार
मुर्मू यांच्या विजयाचा आत्मविश्वास असलेला भाजप निकालानंतर दिल्लीत विजयी मिरवणूक काढणार आहे. राष्ट्रपतींच्या विजयानंतर मिरवणूक काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा राजपथपर्यंत या मिरवणुकीचे नेतृत्व करणार आहेत. तेथे ते भाषण देतील. पहिल्यांदाच आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना देतील. मात्र, मुर्मू या मिरवणुकीत सहभागी होणार नाहीत.




















