आपण २१ व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरतांना स्वतः च्या शरीराला इतकी विश्रांती दिली की आपण चालणं,धावणं विसरलो,दिवसभरात ऑफिस व घरातल्या-घरात बहुतेक करून १ ते २ किलोमीटर किंवा अधिक चालणं होत असेल पण एवढंही अंतर चालतांना थकवा येत असेल तर हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे,बऱ्याच लोकांना चालण्याच्या भरपुर समस्या समोर येत असतात,शारीरिक मूलभूत हालचालींसाठी सुध्दा आज आपल्याला प्रशिक्षकांची गरज भासू लागते म्हणजे ही परिस्थिती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे हे लक्षात घ्यावं,अशीचं जर परिस्थिती राहिली तर भविष्यातील स्वत:च्या आरोग्याची वाटचाल ही अधिक धोकदायक असेल म्हणुन आरामदायी जीवनशैलीकडून जरा बाहेर या आणि स्वतःच्या आरोग्यासाठी चालणं सुरू करा लागा, आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब कमी करून आवश्यक त्याठिकाणीचं मोटार,गाडीचा वापर करा,१ ते २ किलोमीटर साठी चाला,५ ते ७ किलो मिटर साठीसायकल वापरा हेचं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल,दैंनदिन रोजच्या व्यवहारात चालत रहा शक्य असल्यास धावत रहा कारण निरोगी आणि सुदृढ शरीर हेची आपली खरी संपत्ती आहे, सकाळच्या शुद्ध वातावरण तूम्ही चालत असाल तर तुम्हाला आरोग्याचे अनेक फायदे होतील जे तुम्हाला आनंदी व सुदृढ ठेवेल,सकाळच्या कोवळ्या उन्हात व्हिटॅमिन डी भरपुर मिळेल,व्हिटॅमिन डी मुळे शरीराचे हाडे मजबूत होतील, त्याचबरोबर कॅल्शिअमची कमतरता भासणार नाही व आपले हाडे मजबूत होतील.६ किंवा ८ च्या वेळेदरम्यान जर तूम्ही सक्रिय चालत असाल तर तुम्हाला त्याचे भरपूर फायदे मिळू शकतील,दररोज सकाळी चालण्यामुळे तुम्हाला हवेत भरपूर प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत असल्यामुळे आरोग्यासाठी अधिक फायदा होईल.
दररोज सकाळी चालण्यामुळे मानसिक ताणतणावाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल, अति ताणतणाव हा विविध आजारांना आमंत्रण देत असतो त्यामुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता चालणे हा पर्याय आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे,डायबेटिस,ब्लडप्रेशर व हृदयरोगाच्या लोकांसाठी चालणे हा अतिशय उपयुक्त असा व्यायाम आहे.(डॉक्टराच्या सल्ल्यानुसार), चालण्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते त्याचबरोबर प्रतिकारशक्तीही वाढते.
दररोज चालण्या मुळे खाली दिलेले फायदे होतात
-हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
-त्वचा चमकदार होते.
-मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-अति लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यांचे वजन कमी करण्यास अधिक मदत होते.
-मेंदूची कार्यक्षमता वाढत जाते,
झोप चांगली होते.
-ताणतणाव नियंत्रणात राहतो.
-प्रतिकारशक्ती वाढते.
-शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
-थकवा येण्याचे दूर होते.
-शरीरात स्फूर्ती निर्माण होण्यास चांगली मदत होते.
शरीरातील चरबीच्या गाठी कमी -होण्यासाठी चालणे अधिक फायदेशीर ठरते.
-कॅन्सर झालेल्या व्यक्तीसाठी चालणे हे उपयोगी असा व्यायम आहे. जवळजवळ अनेक प्रकारच्या प्रकारच्या आजारांपासून मुक्तता मिळते आंनदी व सुदृढ राहण्यासाठी मदत होते दररोज सकाळी ३० मिनिटे किंवा १ तास चालत रहा,चालतांना न बोलता निसर्गाचा आनंद घेत रहा म्हणजे निसर्ग तुम्हाला अधिक आनंद देण्याचा प्रयत्न करेल.
*“चालणे म्हणजे व्यायाम होय अतिशय सोपा आणि शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असा व्यायाम आहे.*
(पुढच्या लेखात पुन्हा भेटू)
*धन्यवाद.*

पूनम सोनवणे
(शिक्षिका – शारीरिक शिक्षण,नाशिक)




















