जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२५
राज्यातील भावी शिक्षकांसाठी राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने होऊ घातलेल्या शिक्षक पात्रता परीक्षार्थी उमेदवारांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मोफत ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर राबवण्यात येणार आहे.राज्यभरातील विविध विषयांचे तज्ञ ऑनलाईन पद्धतीने परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला सामोरे जातांना आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक असलेल्या टीईटी परीक्षेची उमेदवारांच्या मनातील भीती घालवण्यासाठी तसेच परीक्षा अत्यंत सुलभ आणि सोप्या पद्धतीने देता यावी या उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अँड. संध्याताई सोनवणे आणि प्रदेश कार्यक्रम संयोजक कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.राज्यभरातील उमेदवार यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकणार आहेत.येत्या २३ नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी आणि त्यानंतर ८ फेब्रुवारीला होणारी टीएआयटी या दोन्ही परीक्षार्थी उमेदवार असलेल्या भावी शिक्षकांनी सोबत दिलेला क्यूआर स्कॅन करून ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा किंवा अधिक माहीतीसाठी उपक्रमाचे संयोजक प्रशांत महाशब्दे यांना मोबाईलवर 9823292092 संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
❝ अचानक टीईटी आणि टीएआयटी या परीक्षेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेक भावी शिक्षकांच्या मनात संभ्रम,गैरसमज आणि भीती आहे.परीक्षार्थी उमेदवारांना तज्ञांकडून परीक्षा पॅटर्न आणि परीक्षेला सामोरे जातांना ऑनलाईन सेमिनार घेऊन अगदी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.यामुळे उमेदवारावर दडपण राहणार नाही,असा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा या आयोजनामागील उद्देश आहे. ❞
कु.भाग्यश्री विवेक ठाकरे
प्रदेश कार्यक्रम संयोजक
जिल्हाध्यक्ष,रावेर लोकसभा
राष्ट्रवादी युवती काँग्रेस



















