जळगाव मिरर | 31 ऑक्टोबर 2025
नागरिक मानवाधिकार परिषद यांच्यावतीने आज दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु असलेल्या मनमानी कारभारा विरोधात निवेदन देण्यात आले. यावेळी नागरिक मानवाधिकार परिषदचे उपजिल्हाध्यक्ष अमरनाथ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि , सद्यस्थिती जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरु असून याकडे महाविद्यालयाचे अधिष्ठात गिरीष ठाकूर हे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. तसेच सदरील रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांची सुध्दा याठिकाणी मनमानी सुरु असून त्यामुळे सदरील रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तरी आपणास मी खालील विशेष महत्वाच्या बाबी नमुद करु इच्छित आहे.
राज्यातील सर्व रुग्णालयासाठी भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री यांच्या योजनेतून कोवीड च्या वेळेस ऑक्सीजन प्लॅन्ट सुरु करण्यात आलेला होता व त्याची अंमलबजावणी जळगाव येथील शासकीय महाविद्यालयात देखील सुरु करण्यात आलेला होता. परंतु सद्यस्थिती सदरील प्लॅन्ट हा धुळखात पडलेला आहे रुग्णालयात बाहेरुन ऑक्सीजन पुरवठा करणारे मागच्या काळातील देखील संबंधित अधिष्ठाता याचे पी. ए. यांचा जवळचा नातलग असल्याचे समजते. तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार होत असल्याचे संबंधित रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे मध्ये बोलले जात आहे.
२) रुग्णालयातील अधिष्ठाता यांचे पी.ए. हे महाविद्यालयातील बांधकाम व इतर लहान-मोठ्या कामासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक मंडळी व परिचीत यांचेकडूनच सदरील कामे करुन घेत असल्याचे दबक्या बोलले जात आहे. तरी याबाबत देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
३) सदरील रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर व कर्मचारी यांना शासनाचे नियमावली नुसार ड्रेस कोड चालू केलेला आहे त्याचे याठिकाणी सर्रासपणे उल्लंघन होत आहे, याठिकाणी बहुतेक डॉक्टर व कर्मचारी हे आपणास युनिफॉर्म मध्ये दिसून येत नाही. यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या पेशंटना व त्यांचे नातेवाईकांना डॉक्टर कोण आहे हे देखील समजणे कठीण होते.
६) रूग्णालयामध्ये ब्लड बँक ही आज रोजी अस्तित्वात असतांना देखील जळगाव येथील रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असतो. त्यामुळे रुग्णालयातील गरजू रुग्णांना नाईलाजाने रक्तासाठी बाहेर फेऱ्या माराव्या लागतात व बाहेरुन रक्तपिशवी प्रती नग रु. १२५०/- याप्रमाणे खरेदी करुन आणावी लागत आहे. त्यामुळे याची आपण गंभीर दखल घ्यावी. यासह अनेक मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे.

 
			

















