जळगाव मिरर । ४ नोव्हेंबर २०२५
प्रभू श्रीराम रथोत्सवानिमित्त शहरातील दुध फेडरेशन रोड परिसरात भाविक भक्तांना साबुदाणा आणि केळी वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी अनेक भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संतोष पाटील यांची उपस्थिती होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुरत रेल्वे गेट दूध फेडरेशन, श्री हनुमान मंदिर खडके चाळ, परिसरात प्रभू श्रीराम रथोत्सवानिमित्त साबुदाणा आणि केळी वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी दिलीप पोकळे,नवनाथ दारकुंडे, राजू निकम, कुंदन निकम, विजय यादव, राजु तायडे, भगवान सोनवणे, नितीन भालेराव, भूषण चव्हाण, किरण खंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे आयोजन मेघना सोनवणे व शिवम सोनवणे यांनी केले होते.



















