जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२५
जळगाव तालुका कापूस उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी सौ. सरला चंद्रकांत चव्हाण यांची बिनविरोध निवड आज शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली.
संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला चेअरमनपदाचा मान मिळाला असून सौ. चव्हाण यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. ही निवडणूक जयराज चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली लढलेली होती पूर्णच पूर्ण पॅनल विजय झालेलं होतं
या सभेला व्हाईस चेअरमन युवराज भीला सपकाळे, तसेच संचालक अशोक जगन्नाथ कणखरे, पंडित जिजाबराव चव्हाण, निलेश भुजंगराव चव्हाण, देविदास भीमराव चव्हाण, विकास भागवत भंगाळे, संजय प्रतापराव चव्हाण, रघुनाथ नामदेव सपकाळे, प्रसाद बळीराम चव्हाण, सौ. नयना प्रवीण भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.




















