जळगाव मिरर । १२ नोव्हेंबर २०२५
अनाधिकृत बांधकामावर हातोडा चालण्यापुर्वीच प्रकाशचंद्र जैन संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचे कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. कावडीया यांनी आत्महत्येपुवी अनेकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाईमधील डिटेल्सची तपासणी केली जाणार असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार प्रकाशचंद्र कावडिया वय ५७) हे मेहरुण तलाव परिसरात राहणारी त्यांची मुलगी कमल तन्मय भंडारी यांच्याकडे वास्तव्यास होते. सोमवारी सकाळच्या सुमारास ते मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले असता, त्यांनी विष प्राशन करीत आत्महत्या केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कावडीया यांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून त्यांच्या मृत्यूच्या तपासात त्यांच्या मोबाईलच्या डिटेल्सचीही चौकशी करणार आहे.
संस्थेबाबत घडणाऱ्या घडामोडींच्या तणावातून त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तयांनी जामनेर येथील मित्राला फोन करुन विषारी औषध पिल्याची माहिती दिली. तसेच कावडिया यांच्या मृत्यूचे नेमके कारण अदयाप स्पष्ट झालेला नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विसेरा व मृत्यूचे कारण दोन्हीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला आहे.



















