जळगाव मिरर | १५ नोव्हेंबर २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांसह कार्यकर्ते सत्ताधारी पक्ष असलेल्या महायुतीत येत असताना मात्र जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा नेत्यांना पाठविल्याने जळगाव जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु झाली असतांना शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेचे राज्याचे सचिव संजय मोरे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख निलेश पाटील यांची पक्षात घुसमट होत असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
राजीनामा पत्रात मात्र त्यासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत धुसफूस सुरु असल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला असून लवकरच ते दुसाऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील त्यांची तयारी सुरु असल्याचे सोशल मीडियात त्यांच्याकडून टाकण्यात येणाऱ्या पोस्टवरून दिसून येत आहे



















