जळगाव मिरर । १५ नोव्हेंबर २०२५
तालुक्यातील खेडी खुर्द व धानोरा येथे अवैधरित्या उत्खनन केलेला वाळूचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गौण खनिज विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, गिरणा नदीच्या काठावर असलेला हा १ हजार ब्रासवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सविस्तर वृत्त असे की , जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त होताच त्यांनी गौण खनिज विभागाच्या नायब तहसीलदार रुपाली काळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार काळे यांनी एका पथकासह खेडी खुर्द व धानोरा शिवारात भेटी दिल्या. गिरणा नदीच्या काठावर अवैधरित्या उपसा केलेला सुमारे एक हजारावर ब्रास वाळूचा साठा आढळून आला. त्यानंतर या पथकाने हा साठा ताब्यात घेण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरु केली. पोलिस बंदोबस्तात हा साठा सुरक्षितपणे जप्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली असताना दुसरीकडे या विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जागा मालकांसह अन्य दोषींना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले



















