मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. यामध्ये खान्देशात काही माजी आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकही आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी हे शिंदे गटात सामिल होणार आहेत. रविवारी शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नंदनवन येथे शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकही एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहीती आहे. आज जवळपास १२०० लोक प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी लवकर एकत्र यावं, याची आम्ही वाट पाहतोय. पण, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेला वेठीस धरण्यात आले, असे रघुवंशी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच या आघडीचा फायदा झाला.
जळगावात २०० तरुणांनी दिले राजीनामे
शिवसेनेत नवीन आलेल्यांना अधिक संधी दिली जात आहे तर युवा सेनेत काम करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत युवासेनेचे पदाधिकाऱ्यांसह २०० तरूणांनी राजीनामा दिला असून माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात सामिल झाले असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.




















