जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.गि.न.चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर , साने गुरुजी कॉलनी , जळगाव या शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.०६ डिसेंबर २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार घालून व मेणबत्ती पेटवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास अभिवादन करण्यात आले.शाळेचे उपशिक्षिका सौ.पुनम पाटील , सौ.उज्वला भामरे मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्याम ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाची माहिती सांगितली.शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी भाषणे दिलीत.सूत्रसंचालन सौ रोहिणी निकुम मॅडम व आभार प्रदर्शन सौ.पूनम पाटील मॅडम यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्याम ठाकरे सर , श्रीमती.जयश्री पाटील , श्री.स्वप्निल भोकरे , श्री.महेश तायडे , सौ.शारदा चौधरी , सौ.पुनम पाटील , सौ.दीपिका सोनवणे , सौ. रोहिणी निकुम , सौ.मनिषा वाघ , सौ.उज्वला भामरे , सौ.सुनिता पाटील , सौ.प्रिया कोपरकर , श्री.भूषण अमृतकर या सर्वांनी परिश्रम घेतले.




















