• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची शंभर टक्के लक्ष्यपूर्ती
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी यांनी 10,000 रुपये निधी देऊन केला ध्वज निधी दिन संकलनाचा शुभारंभ

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५

“आपण फक्त ध्वज दिनाचे लक्ष्य पूर्ण केले नाही, तर पुढील वर्षी हे लक्ष्य ओलांडण्याचा निर्धार केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.” अशा शब्दांत जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन कार्यक्रमात निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ म्हणून १०,००० रुपयांचा निधीचे योगदान दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या विशेष कार्यक्रमात यंदाचा १ कोटी ३२ लाख रुपये निधी संकलनाचा लक्ष्य जिल्हा प्रशासनाने शंभर टक्के पूर्ण केल्याची माहिती देताना त्यांनी नागरिक, शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थांचे आभार मानले. येत्या नवीन सत्रात उदिष्टापेक्षा अधिक निधी जमा करून सैनिक कल्याण उपक्रमांना अधिक बळ देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी आपल्या मिलिटरी स्कूलमधील शिक्षणाचा उल्लेख करत जम्मू-काश्मीरमधील एलओसीवरील सैनिकांच्या सेवेसंबंधी प्रत्यक्ष पाहिलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. अत्यंत प्रतिकूल थंडी, शून्याखालील तापमान, गोठलेली जलवाहिनी आणि कठोर परिस्थितीतही निर्धाराने कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचे वर्णन करताना ते क्षणभर भावूक झाले. “सीमेवर उभा असलेला सैनिक सर्वात आधी देशाची आणि नंतर आपली कुटुंबाची काळजी करतो. त्याच्या कुटुंबियांच्या अडचणी—रुग्णालय, शिक्षण, जमीन व्यवहार किंवा अन्य प्रशासनिक कामे—सोडवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असे स्पष्टपणे सांगत त्यांनी सैनिक कुटुंबांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.

जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने गेल्या वर्षभरात निधी संकलनाबरोबरच कायदेविषयक सहाय्य, उपकरणे, मशीन उपलब्ध करून देणे, विविध सामाजिक उपक्रम राबवणे यांत नागरिकांचा मोठा सहभाग लाभल्याचे त्यांनी नमूद केले. सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आवश्यक सर्व समन्वय अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात, तसेच दहावी–बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वीरनारी, वीरमाता, वीरपिता, तसेच उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या शासकीय कार्यालय प्रमुखांचा गौरव करण्यात आला. ध्वज दिन निधी संकलन मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी प्रास्ताविकात ध्वज दिन संकलनाची पार्श्वभूमी, संकलनातील जिल्ह्याचे यश आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, माजी कर्नल व्ही. के. सिंग, जळगाव जिल्हा वकील संघ अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, आरटीओ अधिकारी यांच्यासह शहीद सैनिकांचे पालक, वीरनारी, निवृत्त सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group