• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

धोबी समाजाची ‘लाव रे तो व्हिडिओ’ मोहीम !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
धोबी समाजाची ‘लाव रे तो व्हिडिओ’ मोहीम !
Share on FacebookShare on Twitter

एस.सी.प्रवार्गाच्या पूर्ववत आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही भूमिका

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२५

राज्यात १९६० पर्यंत एस.सी.प्रवर्गात असलेल्या परीट-धोबी समाजाला राज्यघटनेच्या ३४१ कलमाचा भंग करून इतर मागास प्रवर्गात परस्पर समाविष्ट केल्याची चूक राज्य शासनाने केली असून महाराष्ट्रातील धोबी जातीला अनुसूचित जातीत समाविष्ट करून पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘लाव रे तो व्हिडिओ’ अशी राज्यस्तरीय मोहीम राबवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीट -धोबी आरक्षण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२००२ मध्ये शासनाने नेमलेल्या डॉ.भांडे समितीने राज्यातील परीट-धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे,अशी स्वयंस्पष्ट शिफारस केलेली असल्याने यासंबंधी कार्यवाही व्हावी अशी मागणी घेऊन २००६ साली नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या समाजाच्या मोर्चाला तत्कालीन विरोधी पक्षाचे आमदार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाजाची जास्त दिवस दिशाभूल करता येणार नाही असे म्हणत तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांना धोबी समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची सुस्पष्ट शिफारस पाठविण्याची स्वतः मागणी केली होती.२०१४ ते २०१९ असे पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री, मधल्या काळात अडीच वर्ष उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा वर्षभरापासून मुख्यमंत्री अशी सत्तेची सूत्रेच दस्तूरखुद फडणवीस यांच्या हाती असतांना समाजाच्या बहूप्रलंबित मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा असंतोष राज्यातील सर्व समाजाच्या मनात आहे. त्यासाठी समाजाच्या व्यासपिठावरील व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्यापर्यंत पोहचवून हा मुद्दा लक्षात यावा तसेच समाजाला न्याय मिळावा म्हणून सनदशीर मार्गाने ही आंदोलन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

समाजाच्या युवा पिढीला आवाहन :
राज्यातील परीट-धोबी समाजाने विशेषत:सोशल मीडियावर अँक्टिव असलेल्या युवा पिढीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरक्षण देण्याची शिफारस करणारे संपूर्ण भाषण ‘लाव रे तो व्हिडीओ…’ ही टॅगलाईन वापरून व्हाट्सअप, फेसबुक,इन्स्ट्राग्राम आणि विविध सोशल मीडियावर पोस्ट करून महायुती सरकारमधील सर्व मंत्री,तीनही घटक पक्षांचे आमदार-खासदार,प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांपर्यंत कुठलीही अनुचित भाषा न वापरता जास्तीत जास्त व्हायरल करावे,असे आवाहन देखील या पत्रकार परिषदेतून करण्यात आले.

पूर्ववत आरक्षणाची का होतेय मागणी :
राज्यातील परीट-धोबी समाज धनगर,कोळी किंवा मराठा समाजाप्रमाणे नव्याने आरक्षणाची मागणी करीत नसून धोबी जात अस्पृश्यतेच्या निकषात आहे.देशातील १३ राज्यात आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू आहे.१९७६ पर्यंतच्या प्रत्येक एस.सी.जातींच्या यादीत तसेच राजपत्रात धोबी जातीचा समावेश होता.भंडारा व बुलढाणा जिल्ह्यात या जातीला १९५८ पर्यंत एससी प्रवर्गाच्या सवलती मिळत होत्या तसेच राज्यातील धोबी जातीचा समावेश पूर्ववत अनुसूचित जातीत करावा,असा अहवाल डॉ.डी.एम.भांडे समितीने दिला असल्याने पूर्ववत आरक्षण लागू होण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केंद्र सरकारला शिफारस करावी अशी २००२ पासून मागणी प्रलंबित आहे.

पत्रकार परिषदेला यांची होती उपस्थिती :
संत गाडगेबाबा युवा फौंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, राज्य सचिव शंकर निंबाळकर, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष शाम वाघ, डेबूजी फोर्सचे जिल्हाध्यक्ष सागर सपके, ज्येष्ठ नेते दिनकर सोनवणे,लॉड्री असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण राऊत युवा प्रदेश कार्याध्यक्ष दीपक बाविस्कर, प्रसिद्धी प्रमुख राकेश वाघ, डेबूजी युथचे जिल्हाध्यक्ष गणेश सपके हे उपस्थित होते.

Related Posts

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल
क्राईम

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !
क्राईम

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार
जळगाव

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख
जळगाव ग्रामीण

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026
जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !
जळगाव

जळगावमध्ये नवनवीन ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पूवन’ केळी जातींचा तिश्यूकल्चर उत्पादन प्रकल्प सुरु !

March 23, 2026
भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

भोंदू खरातला राजाश्रय देणारे मंत्री अद्याप मंत्रिमंडळात; संजय राऊतांचा हल्लाबोल !

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

कोरोना योद्ध्यांचा हक्कासाठी लढा तीव्र; कायम नोकरीसह भत्त्याची मागणी, भरती प्रक्रियेवरही सवाल

March 23, 2026
अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

अशोक खरात प्रकरण ; पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई !

March 23, 2026
जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

जळगावात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

March 23, 2026
नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्ग: जळगाव महापालिका होणार अधिक लोकाभिमुख

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group