जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२५
जळगाव मनपा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांनी जळगाव महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूकसाठी आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीद्वारे पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास निश्चितच गौरवास्पद असून, पक्ष संघटनाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ तसेच निष्ठावान पक्षकार्यामुळे आ. भोळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक यशस्वी होईल, असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत भाजप जळगाव महापालिकेत भक्कम विजय मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




















