एरंडोल : प्रतिनिधी
येथील काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व परिवारावर द्वेषापोटी लावण्यात ईडी चौकशी च्या निषेधार्थ तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलनकरण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या सूचने नुसार केंद्र सरकार व ईडीने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व त्यांच्या परिवारावर द्वेषापोटी चौकशी लावली असून केंद्र सरकार व ईडी विरोधात तालुका काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ सकाळी दहा वाजता शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले .जो पर्यंत ईडी कार्यालय सोनिया गांधी यांना मुक्त करीत नाही तो पर्यंत सदरचे आंदोलन चालू राहिल.असे यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुड्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. व केंद्र सरकारवर विविध घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन, शहराध्यक्ष संजय भदाणे ,माजी नगरसेवक योगेश महाजन ,काँग्रेस नेते डॉ. फरहास बोहरी ,जाकीर शेख ,कलीम शेख ,राजेंद्र चौधरी, प्राध्यापक आर .एस. पाटील, सुनील पाटील ,सागर पाटील ,निंबा कोळी, समीर शिकलीकर, रवींद्र पाटील, एजाज अहमद, रईस शेख, संजय कलाल, इमरान सय्यद ,अंजूम हाशमी यांच्यासह अस्संक्य कार्यकर्ते उपस्थित होते.
